व्हेरिकोज व्हेन्सपासून मुक्तता मिळवा
व्हिरिकोज व्हेन्स हा पायांना होणारा आजार आहे. हा आजार म्हणजे शिरांची एकप्रकारची पिळवणूक असून, त्यामुळे त्यांची लवचिकता हळूहळू कमी होऊन अंतिम टप्प्यात नष्ट होते. शिरांमधील व्हॉल्व्ह मागील बाजूनं काम करणं कमी करतात, म्हणजे तिथला रक्तप्रवाह खंडीत होतो. यामुळे पुढच्या बाजूनं त्या रक्त अक्षरश: मागं खेचतात. विशेषत: महिलांमध्ये व्हेरिकोज व्हेन्सचा त्रास सौंदर्याशी निगडीत असल्यानं त्या याबाबत फारच ताण घेतात. व्हेरिकोज व्हेन्सची कारणं -अनुवंशिक -सातत्यानं उभं राहून काम करण्याची पद्धत -गरोदरपणा. गर्भनिरोधक गोळ्यांचा नियमित वापर -वय, स्थूलपणा, पायांचं दुखणं किंवा शस्त्रक्रिया लक्षणं -पाय कुरूप दिसण्यास सुरुवात -पायाला जडत्त्व येणं. सतत दुखणं. -घोटा आणि तळपायाला सूज -खाज आणि घोट्याजवळील त्वचेचा रंग नाहीसा होणं -पायात चमक भरणं, मुंग्या येणं वर उल्लेख केलेली लक्षणं ही अगदी प्राथमिक स्वरुपाची आहेत, त्याकडे वेळीच लक्ष दिलं नाही, तर ही लक्षणं गंभीर रुप धारण करतात आणि त्यांची गुंतागुंत वाढते. -थ्रोम्बोफ्लेबिटिस : म्हणजे सुजलेल्या वाहिन्यांमध्ये रक्ताच्या गाठी होणं -व्हेरिकोज एक्झिमा...